Latest Post

Latest Post
Loading...

वेकोलीचे ढिगाऱ्यांबद्दल नेते काय भूमिका घेतील?

वेकोलीचे ढिगाऱ्यांबद्दल नेते काय भूमिका घेतील?


भद्रावती तालुक्यातील माजरी गावात परिस्थिती फार वाईट आहे. घरे उध्वस्त, शेती उध्वस्त, अन्न धान्य सडत आहे. गावात तापाची साथ. शेतकरी मजूर वर्ग हवालदिल. 

गावावरूनच कोळसा खादानीचे ओव्हर बर्डन डंप दिसतात, पहाडासारखे. शिर्णा नदीचे याबजुला गाव आणि शेती आणि पलिकडे वेस्टर्न कोल फील्डचे ढिगारे. प्रचंड पाऊस आणि अप्पर वर्धा लोअर वर्धा दोन्ही धरणांचे दरवाजे उघडल्यावर शांत वाहणारी शीर्णा नदीने उग्र रूप धारण केले. 

ढिगारे असल्यामुळे पाणी गावात शिरला आणि लोकांना तीन दिवस कच्चे बच्चे धरून रेल्वे स्टेशनवर काढावे लागले.

' वेकोली' चे जनरल मॅनेजर (माजरी एरिया) विष्णू गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार ढिगारे ४५ मीटर उंच आहेत. त्यांना ९० मीटर पर्यंत वाढवण्याचे मंजूरी आहे. 

गावकऱ्यांचा मनात एकच भीती दर वर्षी अशी परिस्थिती उद्भल्यास जाणार कुठे? एक दिवस गाव सोडून जाण्याची वेळ येईल. 
दोन दिवसापूर्वी महिलांनी निवेदनाद्वारे वेकोली कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आता या समस्येबाबत जिल्ह्यातील नेते काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.Post a Comment

0 Comments

Write for The Vidarbha Gazette!